loader image
[ays_poll id=7]

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

Feb 24, 2026

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम
मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेची
अंतिम फेरी व पारितोषिक वितरण समारंभ येत्या शुक्रवारी मराठी भाषा गौरव दिनी २७/ फेब्रुवारी /२०२६रोजी सायं.५-०० वा. सितालक्ष्मी हॉल, छत्रे न्यू इंग्लिश स्कूल, मनमाड येथे संपन्न होणार असून मनमाड साहित्य संघाचे अध्यक्ष मा.प्राचार्य श्री. सदाशिव सुतार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात २०० विद्यार्थ्यांमधून प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत निवड करण्यात आलेले मनमाड शहरातील विविध शाळांतील १४ बाल-कुमार कवी-कवयित्री आपल्या कविता सादर करतील. त्यातून पाच बाल-कुमार कवी-कवयित्रींना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व गौरवपत्र मान्यवर पाहुण्यांचा हस्ते दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास अंतिम फेरीसाठी निवड झालेले विद्यार्थी, शाळेचे काव्यस्पर्धा समन्वयक शिक्षक,मान्यवर मुख्याध्यापक व पालक यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन मनमाड साहित्य संघाने केले आहे.
शहरातील सर्वच माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मनमाड शहरातील साहित्यिक चळवळीस या उपक्रमामुळे गती मिळेल व विद्यार्थामधील सृजनशीलता वाढीस लागेल अशी अपेक्षा साहित्य-रसिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

अजून बातम्या वाचा..

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून नागरिकांनी जनकल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा: डॉ भारती पवार

  विकसित भारत संकल्प यात्रा जनजागृती कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि...

read more
चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही...

read more
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी चार सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदके

कृष्णा व्यवहारे मेघा आहेर श्रावणी पुरंदरे साईराज परदेशी यांनी पटकावले सुवर्णपदक क्रीडा व युवक सेवा...

read more
मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ....

read more
.