Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट झेवियर्स शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा

Feb 28, 2026

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये कविश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती व मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक फादर माल्कम नातो,उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्सना,पर्यवेक्षक अनिल निकाळे सर कुमारी सांस्कृती नितीन देवकर व कुमार रुद्र सचिन इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर श्रीमती अंजेलिना झेवियर मॅडम व अशोक गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गायक वृंदाने, ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ हे कुसुमाग्रज लिखित प्रार्थनागीत सादर केले. कुमार रुद्र सचिन इंगळे याने आपल्या भाषणातून मराठी भाषेचे वैभव सांगितले. कुमारी संस्कृती नितीन देवकर हिने आपल्या भाषणातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचा थोडक्यात आढावा घेतला.

मुख्याध्यापक फादर माल्कम यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व तसेच वि.वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकाचे साहित्यिक मूल्य सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक कुमारी बेबी राजेंद्र पगारे हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी समृद्धी रावसाहेब नाईकवाडे हिने केले.

अजून बातम्या वाचा..

आफताब पूनावालाला फाशी देण्याची मागणी, राज्यपालांच्या वक्तव्याचा  युवा सेनेने केला निषेध

आफताब पूनावालाला फाशी देण्याची मागणी, राज्यपालांच्या वक्तव्याचा युवा सेनेने केला निषेध

आफताब पुनावाला वर कारवाईची मागणी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी...

read more
श्रद्धा वालकर हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ; आफताब पुणवाला ला मरेपर्यंत फाशीची मनमाड मनसे ची मागणी

श्रद्धा वालकर हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी ; आफताब पुणवाला ला मरेपर्यंत फाशीची मनमाड मनसे ची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने येथील मनमाड शहर पोलिस स्थानकात श्रद्धा वारकर...

read more
१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]