loader image
[ays_poll id=7]

ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा

Feb 28, 2026


एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.

राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.

 


अजून बातम्या वाचा..

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करून उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजना करा – ना.डॉ.भारती पवार

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांचे त्वरित पंचनामे करून उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांवर उपाययोजना करा – ना.डॉ.भारती पवार

अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात मोठ्याप्रणात शेती व शेतपिकांचे, गुरे जनावरांचे नुकसान झाले आहे त्याच...

read more

पिकांचे खोटे पंचनामे दाखवून नैसर्गिक आपत्तीची मदत परस्पर पत्नीच्या नावे लाटणारा तलाठी निलंबित !

कुसमाडी व हडप सावरगाव येथील शेत जमीनी मूळ वारसदारांच्या नावे करण्याऐवजी ती जमीन पत्नीच्या नावे...

read more

मोदिजींच्या हस्ते राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेचे उद्घाटन – प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड !

'आयुष्मान भारत राष्ट्रीय डिजिटल हेल्थ मिशन' या योजनेत देशातील आरोग्य यंत्रणेत क्रांतिकारी बदल...

read more
.