loader image
[ays_poll id=7]

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

Mar 11, 2026


मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान बाजार समितीचे सचिव श्री. बळीराम लक्ष्मणराव गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना बाजार समितीची रचना, कार्यपद्धती, आर्थिक अहवाल तयार करण्याची पद्धत तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रशासन व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती दिली.

कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, व्यापारी तसेच हमाल-मापारी वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची संस्था असून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या मालाची योग्य मोजणी, पारदर्शक लिलाव प्रक्रिया, साठवण सुविधा व स्वच्छता व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे कार्य सातत्याने केले जाते, असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मनमाड व नांदगाव तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी आपले कृषी उत्पादन विक्रीसाठी या बाजार समितीत आणत असल्यामुळे परिसरातील शेती अर्थव्यवस्थेत या समितीचा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना बाजार समितीची प्रत्यक्ष कार्यपद्धती पाहण्याची संधी मिळाली. त्यामुळे सहकार क्षेत्र, बाजार व्यवस्थापन आणि कृषी अर्थव्यवस्था याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून महत्त्वपूर्ण ज्ञान मिळाले.

या या अभ्यास भेटीसाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.प्रमोद जी. आंबेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाणिज्य विभाग प्रमुख एस. जे. सुखदेवे, डॉ. आरती एस. छाजेड व प्रा. वसंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या अभ्यास भेटीत सहभाग नोंदविला.

 

 


अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
.