loader image
[ays_poll id=7]

मजुराची आत्महत्या

Mar 31, 2026

नांदगांव :सुमितकुमार जगधने

येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून निघालेल्या एका २६ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पवन कारभारी निंबारे (रा. चंदनपुरी, ता. नांदगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

​नेमकी घटना काय?
​मिळालेल्या माहितीनुसार, मयत पवन निंबारे हा आपला लहान भाऊ श्रावण निंबारे याच्यासह नांदगाव रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करत होता. पवन हा आपल्या आईसोबत चंदनपुरी येथे राहत असून, इतर वेळी आई व भाऊ पवन हे शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

​२९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पवनने रेल्वे मालधक्क्यावर मालगाडीतील सिमेंटच्या गोण्या उतरवण्याचे काम पूर्ण केले. त्यानंतर “मी चंदनपुरी येथे घरी जातो,” असे भावाला सांगून तो तेथून निघाला. मात्र, तो रात्री उशिरापर्यंत घरी पोहोचला नाही.

​तलावाजवळ आढळला मृतदेह
​पवन हा २९ तारखेला सायंकाळी घरी न जाता कासारी जवळील चांदेश्वरी पाझर तलाव परिसरात गेला. तेथील वनविभागाच्या हद्दीतील एका झाडाच्या फांदीला दोर बांधून त्याने गळफास घेतला, ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पवनची बहीण शकीला वामन डोळे (रा. जतपुरा) यांनी फोनवरून दिली. त्यानंतर श्रावण निंबारे यांनी ३० मार्च रोजी सकाळी नांदगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

​पोलीस तपास सुरू
​नांदगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १९४ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२६ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भास्कर बस्ते करत आहेत. तरुणाच्या अशा टोकाच्या पावलामुळे चंदनपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
.