loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

May 2, 2026


आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड – मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक व साहित्य, वाचन परंपरे मध्ये मानाचे स्थान असणाऱ्या आणि मनमाड शहराचे सांस्कृतिक वैभव म्हणून ओळख असणाऱ्या व्रत अखंड वाचक सेवेचे हें ब्रीद वाक्य घेऊन शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या 01 मे 1915 रोजी स्थापना झालेल्या मनमाड सार्वजनिक वाचनालयाचा 112 वर्धापन दीन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला शिवसेने च्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख फरहान खान मनमाड नगर परिषद चे लोकनियुक नगराध्यक्ष योगेश (बबलू )पाटील मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, उपाध्यक्ष प्रज्ञेश खांदाट शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मनमाड सार्वजनिक वाचनालय हें शतकोत्तर वाटचाल करतांना 112 व्या स्थापना दिनी संगणक कक्ष सुरु करून आधुनिक डिजिटल ई -वाचनालय चा नवा प्रवास सुरु करीत आहे हा ऐतिहासिक क्षण वाचक चळवळी साठी गौरवाचा आहे असे सांगितले त्यानंतर केंद्र सरकार च्या राजाराममोहन राय प्रतिष्ठान च्या समान निधी अंतर्गत मनमाड सार्वजनिक वाचनालयास मिळालेल्या संगणक प्रिंटर यांचा शुभारंभ व लोक अर्पण फरहान दादा खान व योगेश पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला कार्यक्रम चे सूत्रसंचालन करतांना कल्पेश बेदमुथा यांनी या संगणक साठी अधिकृत शासकीय मान्यता असणारे 21275 रुपये किंमत चे आधुनिक पद्धतीचे ई ग्रंथालय 4.0(e-Grathalayla 4.0) हें सॉफ्टवेअर(आज्ञावली )खरेदी करणार असून वाचनालयांचा भविष्यातील सर्व दैनंदिन कामकाज संगणक द्वारे होणार आहे तर या संगणकी करणा मुळे वाचकांना मनमाड सार्वजनिक वाचनालयात असणाऱ्या 50 हजार ग्रंथ संपदे ची माहिती एका क्लिक वर मिळणार आहे त्यामुळे वाचकांना पुस्तकं शोध सोपे होणार आहे वाचनालय च्या वास्तूनूतनीकरणं,फर्निचर, व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विध्यार्थी साठी अभ्यासीका साठी व वाचनालय डिजिटल करणे साठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या कडून निधी मिळावा ही अपेक्षा आपले मनोगत मध्ये नरेश गुजराथी यांनी व्यक्त केली तर मनमाडचा सांस्कृतिक वारसा असणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या वास्तूचे नूतनीकरणं, अद्यावत डिजिटल ई -वाचनालया साठी तसेच या वाचनालय चा तालुका “अ “दर्जा करणे साठी तालुक्याचे कार्यक्षम आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाने भरघोस निधी उपलब्ध करून देऊ मानस फरहानदादा खान यांनी आपले मनोगत मध्ये व्यक्त करीत वाचनालया च्या कार्याचा गौरव केला मनमाड शहरात वाचन चळवळ निरंतर सुरु ठेवणे साठी मनमाड नगरपरिषद व वाचनालय मिळून उपक्रम राबवू असं आपल्या अध्यक्ष भाषणात नगर अध्यक्ष योगेश पाटील यांनी सांगितले राजाराममोहन राय प्रतिष्ठान कडून हा 70000/- रुपये किमती चा संगणक प्रिंटर मिळवण्यासाठी नितीन पांडे, कल्पेश बेदमुथा यांनी शासना कडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला तर नाशिक विभाग ग्रंथालय उप संचालक सचिन जोपुळे यांचे ही ह्या संगणक मिळण्यासाठी विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला प्रकाश गाडगीळ सर,रमाकांत मंत्री हर्षद गद्रेसर अक्षय सानप, तुषार गोयल,नगर परिषद गट नेते महेंद्र शिरसाठ, नगरसेवक माजिददादा शेख,युवा सेना प्रमुख योगेश इमले, महेश बोराडे,सुभाष माळवतकर अभिषेक पितृभक्त, ,नीलकंठ त्रिभुवन,महेंद्र गायकवाड, गणेश कासार,सुमेर मिसर, गणेश कुनगर, प्रमोद भाबड, संदीप शिनकर,आकाश वाघ अकबर शहा, कुलदीप सिंग चोट मुरादी मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फूलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी मान्यवरां सह मोठ्या संख्येने वाचक व हितचिंतक उपस्थित होते कार्यक्रमा चे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले.

 


अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.