loader image
[ays_poll id=7]

NCMC कार्ड नसलेल्यांनाही सवलत देण्याचे ना. आशिष शेलार यांचे निर्देश

Sep 3, 2026


विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महिला तसेच ज्या वृद्ध व्यक्तींचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना एसटी भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तींचं वय हे 75 पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना एसटीचा प्रवास हा मोफत आहे.

आता सरकारने एसटीचा हा लाभ मिळवण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात केली आहे. या कार्डसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. एक सप्टेंबरनंतर ज्या महिलांकडे एनसीएमसी कार्ड नसेल त्यांना एसटीचं पूर्ण भाडं भरावं लागेल असं एसटी महामंडळाने म्हटलं होतं. मात्र एसटी महामंडळाने NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गौरी-गणपती उत्सवाच्या काळात भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड नाही अशा लोकांना देखील सवलत कायम ठेवा, असे निर्देश शेलार यांनी महामंडळाला दिले आहेत.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे सावित्रीबाई फुले यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे सावित्रीबाई फुले यांना स्मृति दिनानिमित्त अभिवादन

मनमाड - फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांना...

read more
नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

नगर परिषद इमारतीसाठी दहा कोटींचा निधी मंजूर – आमदार कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

मनमाड : राज्य शासनातर्फे नगर परिषदांना वैशिष्टपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत मनमाड नगर...

read more
भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना तीन लाखांची लाच घेतांना एसीबी ने केली अटक

दोन लाखाची लाच स्वीकारताना वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना एसीबी ने केली अटक

धुळे विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गत केलेल्या वीज जोडणीचे बिल विना त्रुटी...

read more
.