loader image
[ays_poll id=7]

येवला तालुक्यात साकारणार 750 कोटींचा भव्य प्रकल्प!

Sep 9, 2026


जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने येवला तालुक्यातील चिचोंडी औद्योगिक वसाहतीत मोठा मका प्रक्रिया उद्योग उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली आहे. सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत चिचोंडी औद्योगिक क्षेत्रात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
सुखजीत स्टार्च कंपनीमार्फत या प्रकल्पासाठी सुमारे ७६० कोटी रुपये गुंतवणूक करुन हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या अनुषंगाने कंपनीने राज्य शासनाकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि सहकार्याची मागणी केली आहे. सदर उद्योगाचा मेगा प्रकल्पामध्ये समावेश केल्याबाबत ऑफर लेटर सुद्धा उद्योग विभागाने या कंपनीला दिले आहे.
प्रस्तावित प्रकल्पात मक्यापासून स्टार्च आणि त्यापासून तयार होणारी विविध उत्पादने निर्मिती करण्यात येणार आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी सुमारे ३.५० लाख मेट्रिक टन मक्याची मागणी निर्माण होईल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील तसेच परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी स्थिर, विश्वासार्ह आणि शाश्वत बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
हे काम १२ ते १५ महिन्यांत पूर्ण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पादनाला अन्नप्रक्रिया उद्योगाची जोड मिळून शेतकरी, स्थानिक उद्योग आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ८ सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सुखजित बायोकॉर्न आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी येवला मतदारसंघाचे आमदार व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ पी. अनबलगन, माजी खासदार समीर भुजबळ, सुखजित बायोकॉन लिमिटेड चे उपाध्यक्ष आणि आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.