loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 30 व्या वर्षी यंदाही सलग 12 दिवस ➖️भाद्रपद महागणेशोत्सव 2026

Sep 9, 2026

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्रीनिलमणी गणेश मंदीरात सन 1997 पासून सलग 30 व्या वर्षी श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे सोमवार दिनांक 14/09/2026 ते शुक्रवार दिनांक 24/09/2026 या कालावधीत सलग 12 दिवस भाद्रपद गणेशोत्सव 2026 आयोजन करण्यात आले आहे मनमाड शहराच्या धार्मिक सामाजिक,सांस्कृतिक ,सेवाकार्य परंपरेमध्ये तसेच सार्वजनिक गणेशोत्सवा मध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि आम्ही परंपरा पाळतो……! आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो…..! हे ब्रीदवाक्य घेवून सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या उत्सव परंपरेला साजेसा असणारा उत्सव श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे गत 29 वर्षा पासून साजरा केला जातो. यंदा हे 30 वे वर्ष आहे मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शन मध्ये श्री नीलमणीस सकाळी ठीक 06-00 वाजता महाअभिषेक व दररोज रात्री ठीक 08 -00 वाजता महाआरती चा नित्य लाभ घ्यावा असे नम्र आवाहन भाविकांना ट्रस्ट तर्फे करण्यात येत आहे तसेच सामाजिक बांधिलकी जपत सन 2017 पासून श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णाच्या सेवे साठी सुरू करण्यात आलेला शिल्लक औषध केंद्र उपक्रम यंदाही सलग १० वर्षी सुरु राहणार आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी आपले कडे असणाऱ्या शिल्लक औषधे की ज्यांची एक्सपायरी शिल्लक आहे अश्या औषधे देणे साठी 9673691925 या मोबाइल नंबर वर संपर्क करावा ही औषधे ट्रस्ट चे स्वयंसेवक आपले कडून संकलित करतील मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेशभक्त नागरिक, बंधु भगिनींनी यंदाचा भाद्रपद गणेश उत्सव उत्साहात साजरा करावा तसेच ट्रस्ट,शासन, पोलिस प्रशासन यांना सहकार्य करावे असे नम्र विनंती/ आवाहन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टतर्फे विश्‍वस्त मंडळाने केले आहे

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
.