loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न

Sep 15, 2026


                        

मनमाड शहराचे चे आराध्य दैवत श्री निलमणीच्या पार्थिव मूर्तीची स्थापना पालखी मिरवणुक पारंपरिक थाटात संपन्न
मनमाड – मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिध्द असणार्‍या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरातील श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीची स्थापना मिरवणुक पालखीतून सकाळी मिरवणुकीची 30 वर्षाची परंपरा अखंडित ठेवत यंदाही सकाळी काढण्यात आली. मनमाड शहराच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेमध्ये मानाचे स्थान असणार्‍या आणि❗ आम्ही परंपरा पाळतो.. आम्ही संस्कृतीचे रक्षण करतो❗ हे ब्रीदवाक्य घेवून काम करणार्‍या श्री निलमणी गणेश मंडळातर्फे यंदा ही सन 1997 पासून सलग 30 व्या वर्षी या स्थापना मिरवणुकीचे आयोजन सकाळी वेळेवर आयोजन करण्यात आलेल्या या मानाच्या पालखी मिरवणुकीचा आरंभ श्री निलमणी गणेश मंडळा चे राजेश निकुंभ यांनी श्रीफळ वाढवून केला. संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणार्‍या या मिरवणुकीत मिरवणुक मार्गावर सुशोभित रांगोळी, तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा ध्वज (मानाची अब्दागिरी), सनई चौघडा व वाद्यवृंद लावण्यात आले होतेे. मिरवणुकीत शंखनादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. मनमाड शहरात श्री निलमणीच्या पालखी स्थापना मिरवणुकीचा शुभारंभ झाल्यानंतर इतर सार्वजनिक मंडळांमध्ये मिरवणुकां निघून स्थापना करण्यात येते. मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर श्री निलमणीच्या पार्थीव मुर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिंनीद्वारे औक्षण करण्यात आले. मिरवणुकीमध्ये खडी साखरेचा/मोदकाचा महाप्रसाद सर्व भाविकांना मिरवणुकीत वाटण्यात आला. मान्यवर पुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात श्री निलमणी ट्रस्ट चे विश्वस्त सौ. व श्री. शेखर पांगुळ यांच्या हस्ते पार्थीव मुर्तीची विधीवत स्थापना करण्यात आली. या स्थापना मिरवणुकीत श्री निलमणी गणेश सार्वजनिक ट्रस्टचे विश्‍वस्त अध्यक्ष, किशोर गुजराथी, सचिव नितिन पांडे, शेखर पांगुळ, गोविंद रसाळ प्रज्ञेश खांदाट, नारायण फुलवाणी, भिकाजी कुलकर्णी,आदी सह मनमाड नगर परिषद चे लोकनियुक्त नगर अध्यक्ष योगेश पाटील,अक्षय सानप अभिषेक पितृभक्त, भरत छाबडा,क्रांती आव्हाड संदीप सिनकर, राहुल लांबोळे,मच्छिन्द्र साळी, सिद्धेश परब, अक्षत झाल्टे, सतीश शेकदार , अंकुश वानखेडे,अक्षय छाबडा,रोहित कुलकर्णी, सचिन व्यवहारे, प्रणव ललवाणी, किशोर आव्हाड, दिपक शिंदे,नीलकंठ त्रिभुवन, किरण त्रिभुवन अनंता कुलकर्णी यांच्यासह गणेशभक्त मोठ्या संख्येने या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले. या मिरवणुकीत श्री नवनीत वाद्यवृंद पारंपारिक पध्दतीने श्री निलमणी गणेश च्या पालखी सन्मुख वादनाची प्रात्यक्षिके सादर केली. बारा दिवस निलमणी गणेश मंदीरात दररोज सकाळी ठीक 06 वाजता महाअभिषेक /रात्री ठीक 08 वाजता महाआरती व दोन्हीही वेळेस सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सह भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.तर ट्रस्ट तर्फे यंदाही सामाजिक बांधिलकी जपत सलग 09 वर्षी शिल्लक औषध संकलन उपक्रम या उत्सव काळात राबविण्यात येणार आहे पालखी मिरवणुकीचे नियोजन श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने केले.तर मनमाड शहर पोलिस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शन मध्ये पालखी मिरवणुकी दरम्यान चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता सकाळी निघालेल्या या पालखी मिरवणुकीत दर्शना साठी गणेश भक्तांचा मोठा उत्साह दिसला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड शहरात भाजपा च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती साजरी

मनमाड - भाजपा मनमाड शहर मंडला च्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या...

read more
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
.