loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आजी आजोबा दिन उत्साहात संपन्न

Sep 18, 2026


मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आजी आजोबा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॉल्कम ,माननीय उपमुख्याध्यापिका सिस्टर ज्योत्स्ना, माननीय पर्यवेक्षक श्रीयुत अनिल निकाळे सर तसेच निमंत्रित आजी आजोबा म्हणून श्री. भानुदास पुंजाजी जाधव व सौ. काशाबाई भानुदास जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्र सचिन इंगळे याने केले तर आभार प्रदर्शन कुमारी विद्या विनोद कुसमाडे हिने केले. सिद्धार्थ विनोद साबळे याने आपल्या भाषणातून कुटुंबातील आजी आजोबांचे महत्त्व विषद केले तर माननीय मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील आजी-आजोबांचा आदर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. निमंत्रित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री भानुदास जाधव यांनी आपल्या भाषणातून आजी-आजोबांचं नातूच्या जीवनातील महत्त्व सांगून आजी-आजोबांची काळजी घेण्याचे आवाहन केले. श्री व सौ जाधव हे शाळेतील इयत्ता दहावी ब ची विद्यार्थिनी कुमारी मयुरी त्रिलोक जाधव हिचे आजी आजोबा आहेत.


अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.