loader image
[ays_poll id=7]

नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करा – गणेश धात्रक यांचे गिरीश महाजनांकडे मागणी

Sep 22, 2026

नांदगाव विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे नांदगाव विधानसभा प्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाडचे सभापती तथा मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांची भेट घेतली.

यावेळी नांदगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकरी व जनतेच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, असा आग्रह धात्रक यांनी पालकमंत्री महाजन यांच्याकडे धरला.

दरम्यान, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियान अंतर्गत भाजपा नांदगाव विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता. या ठरावाच्या अनुषंगाने दुष्काळ, चारा छावनी, पाणी पुरवठा, दुष्काळाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना आदि विषयांबाबत चर्चा देखील ना. महाजन यांचेसोबत करण्यात आली.

या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन नांदगाव विधानसभा मतदारसंघात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांनाही सादर करण्यात आले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.