Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दिपक गोगड यांचेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु.51000/-

Sep 23, 2026

राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच परिस्तिथीची संवेदनशीलतेणे नोंद घेत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांनी नांदगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. या दौऱ्यात ना.महाजन यांनी ग्रामीण भागातील पिकांची पाहणी केली. सदर दौऱ्यात मनमाड बाजार समितीचे माजी सभापती दिपक गोगड यांनी दुष्काळ काळात शेतकरी बांधवाना सहायता म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस 51000 रुपयांचा धनादेश ना. महाजन यांना सुपूर्त केला. राज्यातून दुष्काळासाठी प्रथमच मुख्यमंत्री सहायता निधीस गोगड यांनी त्यांचे योगदान नोंदविले.

यावेळी विधान परिषद आमदार गोकुळ गिते, नांदगावचे आमदार सुहास कांदे, भाजप जेष्ठ नेत्या जयश्री दौंड, बाजार समिती सभापती गणेश धात्रक, उपसभापती पुंजाराम आहेर, संचालक योगेश कदम, भाजपा तालुकाध्यक्ष मनीषा काकड, जयकुमार फुलवानी, मुकुंद एळींजे, गिरीश गोगड, आनंद बोथरा आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व श्रावणी पुरंदरे यांची निवड

      पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी आकांक्षा व्यवहारे, मेघा आहेर व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]