loader image
[ays_poll id=7]

नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पास केंद्राची मंजुरी – नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच

Sep 23, 2026

नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशा नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नदीजोड प्रकल्पातील हा केंद्राची मान्यता मिळाली आहे.

कोकण पट्टयातून पश्चिमेकडे समुद्रात वाया जाणारे अतिरिक्त पावसाचे पाणी अडवून ते पूर्व वाहिनी गिरणा नदी खोऱ्यात वळवणे असे प्रकल्पाचे स्वरूप आहे. या प्रकल्पाद्वारे नार आणि पार नद्यांमधील सुमारे १०.७६ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, बागलाण (सटाणा), देवळा तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर आणि धरणगाव या तालुक्यांना मोठा फायदा होणार आहे.

नांदगाव तालुक्याच्या पदरी निराशाच…

नार-पार मध्ये नांदगाव तालुक्याचा समावेश करून नांदगाव तालुक्याला असलेले दुष्काळाचे ग्रहण कायमस्वरूपी पुसण्यात यावे यासाठी राजकीय, शासकीय व प्रशासकीय स्तरावर पुरेसा पाठपुरावा न झाल्यामुळे नार-पार मध्ये नांदगावचा समावेश झाला नाही आणि तालुक्याच्या पदरी पुन्हा निराशाच आली आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.