Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

Oct 14, 2026

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विविध योगप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांची जिल्हास्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ट्रेडिशनल योग सिंगल प्रकारात नमरा कादरी हिने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. रिदम योग टीम प्रकारात ऋत्वा पटेल आणि अलीना कादरी यांनी उत्कृष्ट सांघिक सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला. तसेच आर्टिस्टिक योग टीम प्रकारात सिमराह कादरी आणि अंशरा शाह यांनी आपल्या कौशल्यपूर्ण सादरीकरणाने प्रथम क्रमांक मिळविला.

विद्यार्थिनींना शाळेचे क्रीडाशिक्षक करुणा मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन मिळाले. तसेच हरीश सर , धीरज सर यांचे देखील मार्गदर्शन मिळाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची आता जिल्हास्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक माननीय सौरभजी जैन सर, उपमुख्याध्यापिका प्रिती परदेसी मॅडम, व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

योग, शिस्त, एकाग्रता आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]