Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

Oct 29, 2026

अमरावती विभागात आ. सुहास कांदे यांच्या नियोजनबद्ध रणनीतीमुळे किरण सरनाईक यांचा दणदणीत विजय

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीच्या ठएम निवडणुकीत महायुतीचे (शिवसेना शिंदे गट) विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला. या विजयामागे शिवसेना शिंदे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख तथा आमदार सुहास कांदे यांनी आखलेली रणनीती आणि संघटनात्मक ताकद अत्यंत निर्णायक ठरली असून, अमरावतीतही कांदेची राजकीय जादू चालल्याचे अधोरेखित झाले आहे.
या निवडणुकीत पहिल्या पसंतीक्रमाच्या फेरीत कोणताच उमेदवार विजयाचा कोटा गाठू शकला नव्हता. अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या मतमोजणीत किरण सरनाईक यांनी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करत महाविकास आघाडीच्या (काँग्रेस) अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांचा पराभव केला. सरनाईक यांच्या या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती विभागात जल्लोष साजरा केला. या प्रतिष्ठेच्या मतदारसंघाच्या समन्वयकाची संपूर्ण जबाबदारी पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. कांदे यांच्या खांद्यावर सोपवली होती.

शिंदे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत, आ. कांदे यांनी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच अमरावती विभागात तळ ठोकला होता. त्यांनी अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांचा दौरा करून विधानसभा निहाय बैठका घेण्याचा धडाका लावला. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात सूक्ष्म नियोजन (मायक्रो प्लॅनिंग) करत कांदे यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. निवडणुकीच्या रिंगणात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरून त्यांनी प्रत्यक्ष कामाला लावले. शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी, संघटनात्मक ताळमेळ आणि मतदानाच्या दिवसापर्यंत अचूक नियोजन राबविल्यामुळेच ही जागा पुन्हा खेचून आणण्यात महायुतीला यश आल्याचे म्हटले जात आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता – आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश ‘ट्रिगर १’ लागू

नांदगाव तालुक्यात कोरड्या दुष्काळाची दाहकता - आमदार कांदेंच्या पाठपुराव्याला यश 'ट्रिगर १' लागू...

read more
क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपरिषदेला इशारा

क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा; शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगरपरिषदेला इशारा

मनमाड शहरात असलेला क्रांतीवीर वसंतराव नारायण नाईक यांचा अर्धाकृती पुतळा हटवून त्या ठिकाणी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]