Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

देशाविरोधी शक्तींच्या षडयंत्रांना हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा – मा.आमदार अमोल जावळे

Nov 6, 2026

भाजपा नाशिक (उत्तर) जिल्हा राष्ट्रीय चिंतन संवाद बैठक मनमाड येथे संपन्न

सध्या देशात व राज्यात सरकारविरोधात अपप्रचार करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या देश-विदेशी शक्तींच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने आक्रमक रणनीती आखली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नाशिक (उत्तर) जिल्ह्याची महत्त्वाची राष्ट्रीय चिंतन संवाद बैठक नुकतीच मनमाड येथे पार पडली. महाराष्ट्र विधानसभा सदस्य तथा नाशिक उत्तर जिल्ह्याचे प्रभारी आणि बैठकीचे प्रमुख वक्ते आदरणीय आमदार अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा नाशिक उत्तर ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय यतीनदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.

कार्यालयात दीप प्रज्वलन आणि भारतमातेच्या पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. मंचावर भाजपा विधानसभा प्रमुख गणेश धात्रक,ज्येष्ठ नेत्या ऍड. जयश्रीताई दौड, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सचिन लुणावत, जिल्हा चिटणीस तथा मनमाड मंडळ प्रभारी जयकुमार फुलवाणी, भाजपा महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सोनालीराजे पवार, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष समीर समदडिया, तसेच सचिन संघवी, उमाकांत राय आदी मान्यवर उपस्थित होते.

देशविरोधी शक्तींचे षडयंत्र हाणून पाडा: नितीन पांडे

प्रास्ताविक करताना जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील साडेबारा वर्षांच्या उत्कृष्ट, प्रामाणिक आणि वेगवान विकास करणाऱ्या सरकारविरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. हा देश-विदेशी शक्तींचा राष्ट्रविरोधी अजेंडा व षडयंत्र हाणून पाडण्यासाठीच या राष्ट्रीय चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवा: यतीन कदम

जिल्हाध्यक्ष यतीनदादा कदम यांनी आपल्या मनोगतात संघटनात्मक आढावा घेतला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारने घेतलेले लोककल्याणकारी निर्णय तळागाळातील सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

एस.आर.आय. प्रक्रिया आणि बांगलादेशी घुसखोरीवर आमदार अमोल जावळे यांचे मार्गदर्शन लाभले –

प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना आमदार अमोलदादा जावळे यांनी एस.आर.आय. प्रक्रिया, बांगलादेशी घुसखोरी, देशात विदेशी शक्तींच्या मदतीने सरकारविरोधात होणारी खोटी आंदोलने, देशाची सीमा सुरक्षा, अर्थव्यवस्था आणि शैक्षणिक धोरणाबाबत सुरू असलेल्या अपप्रचारावर सखोल प्रकाश टाकला. देशविरोधी शक्तींचा मुकाबला करण्यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी सतर्क आणि सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विविध नियुक्त्या व मान्यवरांचा सहभाग

या बैठकीत भा.ज.पा व्यापारी आघाडी व उत्तर भारतीय सेलच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भा.ज.पा व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सचिन लुणावत यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस बापूसाहेब पाटील यांनी मानले.

या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष गोविंद कुशारे, मयूर मेघराज, जिल्हा चिटणीस विजय मिश्रा, नीलकंठ त्रिभुवन, भाजप नांदगाव मंडल अध्यक्ष संजय सानप, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, भाजप जिल्हा प्रसिद्ध प्रमुख अमोल बनसोडे, सचिन कांबळे, एकनाथ बोडखे, नगरसेवक मुकुंद एलिंजे, आनंद काकडे, अकबर शहा, किरण उगलमुगले,अमित गोगड,

गणेश शिंदे, गोविंद बापू कोठावदे, सुधाकर पगार, दीपक खैरनार, नानासाहेब लहरे, राजुसिंग परदेशी, दत्ता सानप, काकड सर, बुधण बाबा शेख, संदीप पगार, शर्मा ताई, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सनी फसाटे, सूरज पवार, सुमेर मिसर, गणेश कासार, मुर्तुझा रस्सीवाला, डॉ. नितीन जैन, डॉ. भूषण शर्मा, सुधाकर मोरे, सचिन कराड, सुनीता वानखेडे, दीपक पगारे, सप्टेंश चौधरी, शाम महाले, सौ. इंगळे ताई, संजय शर्मा आदी मान्यवरांसह नाशिक जिल्ह्यातून पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे संयोजन नांदगाव विधानसभा प्रमुख गणेश धात्रक, व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष सचिन लुणावत, जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी, सचिन संघवी व शहर सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]