Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

माणुसकीच्या संस्कारांची छोटी पावले; प्रकृती स्कूलच्या चिमुकल्यांचा स्तुत्य उपक्रम

Nov 22, 2026

प्रकृती स्कूल मनमाडच्या वतीने दिवाळी गृहपाठांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना औषध पाकिटे (Medicine Envelopes) तयार करण्याचा उपक्रम देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी हा उपक्रम उत्साहाने व यशस्वीरीत्या पूर्ण केला. शनिवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग शिक्षिका सौ.नमिता पिल्लई ,कु. तरन्नूम शेख, सौ.मानसी कळमकर व विषय शिक्षिका सौ.आसावरी पवार, कु.स्नेहल गवई आणि सौ.पुनम साळस्कर या शिक्षकांसह मनमाड येथील शासकीय सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन स्वतः तयार केलेली औषधांची पाकिटे सुपूर्द केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये दया, सहकार्य, दातृत्व, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक सौरभ जैन सर, उपमुख्याध्यापिका कु. प्रीती परदेशी मॅम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

“ज्ञानासोबत माणुसकीचे संस्कार रुजवणे, हाच खऱ्या शिक्षणाचा पाया!” या विचाराला सार्थ ठरवणारा प्रकृती स्कूलचा हा उपक्रम मनमाडमध्ये एक प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]