loader image
[ays_poll id=7]

आता भारतीय परंपरा, संस्कृतीवर पदवी अभ्यासक्रम !

Sep 15, 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे ५ वर्षांसाठी किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.

अभ्यासक्रमाविषयी…

यानिर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार असून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्व निधीतून करावा लागणार असून संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

संतपीठाविषयी…

मराठवाडा विकासाच्या ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली असून यासाठी ज्ञानेश्वर उद्यानानजीकची १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती त्यानुसार संतपीठाची प्रशासकीय इमारत,दोन वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. सुरुवातीला सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेला हा विषय नंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.

अजून बातम्या वाचा..

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

प्रभु रामचंद्र कर्मभूमी ते जन्मभूमी – २२ डब्यांच्या पंचवटी अयोध्या आस्था एक्स्प्रेसला ना.भुजबळांनी दाखवीला हिरवा झेंडा

नाशिक ते जन्मभूमी असलेल्या अयोध्या हा प्रवास होऊन प्रभू रामलल्लाचे दर्शन ज्येष्ठ नागरिकांना व्हावे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड सार्वजनिक वाचनालया चा शतकोत्तर वाटचाली निमित्त नाशिक ग्रंथोत्सव -2023 मध्ये शासना तर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरव सत्कार

मनमाड - ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य मुबंई,नाशिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, विभागीय...

read more
भारतीय रेल्वे 554 स्टेशनच्या अमृत भारत रेल्वे स्टेशन विकास योजने मध्ये मध्य रेल्वे भुसावळ मंडलातील रापली अंडरपास निर्माण विकास कामाचे  पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीने द्वारे शुभारंभ व लोकार्पण  कार्यक्रम संपन्न

अमृत भारत रेल्वे स्टेशन अंतर्गत संपूर्ण देशात भारतीय रेल्वे द्वारे 554 रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास...

read more
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला – मुख्यमंत्री शिंदे यांचेकडून शोक व्यक्त

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख...

read more
बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

बघा व्हिडिओ : स्वच्छ  जंगल अभियान – ताडोबा जंगलात चक्क वाघानेच केले स्वच्छ जंगल अभियान सुरु

नांदगांव: मारुती जगधने जंगलाचा राजा सिंह असला तरी वाघाची डरकाळी सर्वदूर असते वाघ म्हटले की थरकाप...

read more
१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर...

read more
.