loader image
[ays_poll id=7]

आता CSC सेन्टर्स देतील रेशनकार्ड संबंधी सेवा !

Sep 20, 2021

कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दस्त म्हणजे रेशन कार्ड. रेशन कार्ड हि आपली व आपल्या परिवाराची ओळख आहे. शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रत्येक योजनेच्या आवश्यक कागदपत्रात रेशन कार्डचा समावेश असतो. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे त्रस्त नागरीकानादेखील रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत रेशन देण्यात आले आहे. 

आता रेशन कार्ड संबंधीच्या कामांसाठी व नागरिकांच्या सुविधेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाशी करार केला. याद्वारे देशभरातील CSC सेन्टर्स मधून रेशन कार्ड संबंधी सेवा उपलब्ध करून दिल्या जातील. या भागीदारीमुळे देशाच्या मोठ्या भागातील लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. डिजिटल इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली. 

रेशन कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे : 

>> कुटुंबप्रमुखाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो
>> रेशन कार्ड रद्द करण्याचे प्रमाणपत्र (आधी रद्द केले असल्यास)
>> कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पहिल्या आणि शेवटच्या पानाची छायाप्रत
>> गॅस पासबुकची फोटोकॉपी
>> संपूर्ण कुटुंब किंवा युनिटच्या आधार कार्डाची छायाप्रत
>> सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र किंवा हायस्कूल प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्डची छायाप्रत
>> जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC) दस्तऐवजाची प्रत (लागू असल्यास)
>> दिव्यांग ग्राहकांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत
>> मनरेगा जॉब कार्ड धारक असल्यास जॉब कार्डची छायाप्रत
>> उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची छायाप्रत
>> पत्त्याच्या पुराव्यासाठी वीज बिल, पाणी बिल, घरपट्टी, भाडेनामा यापैकी कोणत्याही एकाची प्रत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.