loader image

मनमाड महाविद्यालयात पर्यटन दिनाचे उत्साहात स्वागत

Sep 27, 2021


मनमाड:- महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागांतर्गत 27 सप्टेंबर हा “जागतिक पर्यटन दिन” ऑनलाईन माध्यमातून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. पंढरीनाथ करंडे (राजूर महाविद्यालय ता.अकोले) यांनी आपल्या मनोगतातून पर्यटन दिनाचे महत्त्व सांगून मानवी जीवनासाठी पर्यटन अत्यन्त महत्वाचे आहे असे स्पष्ट केले पर्यटनामुळे माणसाचा उत्साह वाढतो तसेच जीवन जगण्याची पुन्हा नवीन उमेद निर्माण होते पर्यटनामुळे आरोग्य उत्तम राहते कामाचा उत्साह वाढतो नैराश्य दूर होते पर्यटनाचे स्थानिक पर्यटन, जिल्हा अंतर्गत पर्यटन, राज्य अंतर्गत पर्यटन, देशांतर्गत पर्यटन, आंतरराष्ट्रीय पर्यटन याविषयी सविस्तर माहिती स्पष्ट केली कोरोना काळात पर्यटन व्यवसायावर झालेला विपरीत परिणाम याविषयी सविस्तर माहिती सांगितली व उपाययोजना काय याविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रवास करायचे शिका व प्रवासातून शिका असे संबोधन केले. गड किल्ले सर करणे, नवीन सांस्कृतिक स्थळांना भेटी देणे, प्राकृतिक घटकांना भेटी देणे, यातून आपला दृष्टिकोन व्यापक होतो पर्यटनामुळे माणसाचे मन शांत होते व जग सुंदर आहे अशी आपल्याला शास्वती येते यातूनच पर्यटन व्यवसायाला चालना ही मिळते पर्यटनामुळे आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा उजळून दिसते असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी विद्यार्थी श्री नारायण सानप (असिस्टंट मॅनेजर आर बी आय बँक मुंबई) व डॉ. सुनील दगडू ठाकरे (एस. पी. कॉलेज पुणे ) यांनी आपले मनोगत व्यक्त करून महाविद्यालयाचे ऋण व्यक्त केले.या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून के.बी.एच. महाविद्यालय निमगाव येथील प्राचार्य व संचालक ,महात्मा गांधी विद्यामंदिर डॉ. सुभाष निकम व महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथील उप-प्राचार्य डॉ. चंद्रशेखर एम. निकम तसेच विंचूर दळवी येथील प्राचार्य डॉ. रवींद्र शिवाजी देवरे , मनमाड महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ.पी.जी. आंबेकर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भूगोल विभाग प्रमुख प्रा.एस.आर.पगार यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा. देविदास विठ्ठल सोनवणे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.पी. व्ही.अहिरे यांनी केले . कार्यक्रमासाठी कॅप्टन. प्रकाश बर्डे, डॉ. गणेश गांगुर्डे कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.