शिरूर येथील युवा ठेकेदार चि.आदित्य संदीप चोपडा यांचा मृतदेह काल पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण या गावी विहिरीत तरंगताना आढळून आला. या प्रकरणात घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा मनमाड शहर भाजप व मनमाड शहर भाजप जैन प्रकोष्ठ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व या प्रकारणाची त्वरित चौकशी करून गुन्हेगारांना त्वरित शिक्षा करण्यात यावी या मागणीचे निवेदन मनमाडचे पोलीस निरीक्षक गीते यांचेकडे देण्यात आले.
सदर प्रसंगी भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, जैन प्रकोष्ठ प्रदेश संयोजक सचिन संघवी, व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत, जैन प्रकोष्ठ शहराध्यक्ष आनंद बोथरा, भारतीय जैन संघटनेचे दिनेश मुनोत, महेंद्र गांधी, दीपक मुनोत, संजय चोपडा, सुशील संकलेचा, अमरचंद मु













