loader image
[ays_poll id=7]

क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक !

Oct 18, 2021


भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग याला रविवारी हरियाणातील हांसी येथे पोलिसांनी अटक केले. युवराजनं भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याच्यावर जातीवाचक टिप्पणी केली होती आणि त्याविरोधात हांसी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल झाली होती. त्यानं ही टिप्पणी मागच्या वर्षी रोहित शर्मासोबतच्या लाईव्ह चॅट दरम्यान केली होती आणि त्यात त्यानं युझवेंद्र चहलवर अपमानजनक टिप्पणी केली होती, हांसी पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर युवराजला औपचारिक जामिनावर सोडण्यात आले. काही दिवसांपूर्वी याच प्रकरणात हायकोर्टानं युवराजला जामिन दिला होता. युवराजसह सुरक्षारक्षक आणि स्टाफ व वकील होते

रोहित शर्मासोबत इंस्टाग्नामवर चॅट करताना त्यानं चहलबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ८ महिन्यांनंतर हरयाणा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केला होता. हिसार क्षेत्रात येणाऱ्या हन्सी पोलिस स्थानकात युवीविरोधात IPC कलम (Sections) 153, 153A, 295, 505, उपकलम 3 (1) (r) and 3 (1) (5) of the SC/ST Act नुसार FIR दाखल झाला होता. दलितांच्या हक्कासाठी लढणान्या कार्यकर्त्यानं युवीविरोधात पोलिस चौकीत तक्रार दाखल केली होती. रोहितसोबतच्या चॅटदरम्यान युवीन चहलला भंगीअसं संबोधले होते आणि त्याच्या या विधानावर सोशल मीडियावर प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

बघा व्हिडिओ – विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने पंतप्रधान मोदी यांची घेतली भेट

विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान...

read more
.