loader image
[ays_poll id=7]

“केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांना प्रतिबंध” – राज्यमंत्री डॉ.भारती पवार

Oct 21, 2021


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ.भारती प्रवीण पवार यांनी आज निर्माण भवनातून “फिक्की हेल्थकेअर उत्कृष्टता पुरस्कार” सोहळ्याला आभासी माध्यमातून संबोधित केले.

केंद्रीय मंत्री महोदयांनी सुरुवातीला कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. सक्षम गट, केंद्र आणि राज्य सरकार यांच्या समन्वयाने कोविड-19 विरोधातल्या लढ्यात मोठे योगदान दिल्याबद्दल भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघ, फिक्कीची त्यांनी प्रशंसा केली. आरोग्यसेवा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत विविध विकासात्मक कामे केल्याबद्दलही त्यांनी फिक्कीचे कौतुक केले.

“भारतात परडवणारी, सुलभ, सुरक्षित आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.” असे डॉ पवार म्हणाल्या. “भारत सरकारने संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलनासाठी तसेच माता आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी विविध देशव्यापी कार्यक्रम सुरू केले” असेही त्यांनी सांगितले.

सार्वत्रिक आरोग्यसेवेचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने काम करताना, जगातील सर्वात मोठा सार्वजनिक अर्थसहाय्य असलेला आरोग्य सेवा कार्यक्रम, ‘आयुष्मान भारत अभियान’ सरकारने सुरू केला हे मंत्री महोदयांनी अधोरेखित केले. डिजिटल आरोग्य अभियानाचा समावेश करण्यासाठी या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे. एकाच मंचावर आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध घटकांचे सहज एकत्रीकरण करणे आणि उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध करणे हा यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले.

“सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये विकासासाठी योग्य वातावरण निर्माण करण्याकरिता तसेच देशभरातील रुग्णालये, सार्वजनिक निधी असलेल्या प्रयोगशाळांच्या सार्वजनिक-खाजगी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी अनेक आर्थिक सहाय्य योजना सुरू केल्या आहेत अशी माहिती डॉ.पवार यांनी दिली. राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि निमवैद्यक परिषद (पॅरामेडिक्स कौन्सिल) या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील महत्वाची कामगिरी ठरल्या आहेत असे त्या म्हणाल्या.

भारताच्या आरोग्यसेवा निर्देशांकाने गेल्या दशकात सातत्याने सुधारणा दर्शवली आहे. “केंद्र सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंध, नियंत्रण आणि निर्मूलनासाठी तसेच माता आणि बाल आरोग्य सुधारण्यासाठी विविध देशव्यापी कार्यक्रम सुरू झाले आहेत.” अशी माहितीही मंत्री महोदयांनी दिली.

देशात आजपर्यंत कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या 99 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. सरकारने या वर्ष अखेरपर्यंत देशाच्या संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे अशी माहिती त्यांनी कोविड-19 विरोधातल्या लढ्यातील तपशील सांगताना दिली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत, सध्या “भारत हा जागतिक वैद्यकीय उपकरणांच्या बाजारपेठेतील अग्रगण्य देशांपैकी एक आहे.” असेही त्यांनी नमूद केले.

त्यांनी फिक्की आणि इतर मान्यवरांचे भारतातील आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल आभार मानले आणि पुढील कार्यात सरकारचा नेहमीच पाठिंबा राहिल असे आश्वस्त करत भाषणाचा समारोप केला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.