Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

Nov 6, 2021

 

मनमाड :-महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे थोर स्वातंत्र्य सेनानी, शेतकरी कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधी विद्यामंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थांचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या ६० व्या स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या शुभहस्ते कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी कर्मवीरांच्या जीवन कार्याचा परिचय करून देत असताना त्यांनी स्थापन केलेल्या महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या महाराष्ट्रातील दोन अग्रगण्य संस्थांची स्थापना करून शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी,आदिवासी भागा पर्यंत पोहोचण्याचे महान सामाजिक व शैक्षणिक कार्याचा उल्लेख केला. तसेच ते पुढे म्हणाले की कर्मवीरांनी उच्च शिक्षण घेऊन नोकरी न करता स्वतःला व हिरे परिवाराला सामाजिक कार्यात वाहून घेतले. महसूल मंत्री असताना शेतकरी कुळ कायदा निर्माण करून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला त्यांच्या कार्य कर्तृत्वातून ते कर्मवीर झाले. असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य डॉ.पी.जी. आंबेकर, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती पालवे, कुलसचिव समाधान केदारे, कार्यालयीन अधीक्षक एकनाथ अहिरे, प्राध्यापक वृंद व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.गणेश गांगुर्डे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डॉ. पवनसिंग परदेशी आणि राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एन. ए. पाटील यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]