जर तुम्ही या आठवड्यात बँकेशी संबंधित कामांचा निपटारा करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही प्रथम बँकेच्या सुट्ट्यांची यादी पहा. या आठवड्यात 5 दिवस विविध राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत. संपूर्ण यादी पहा.
10 नोव्हेंबर : पाटणा आणि रांचीमध्ये छठपूजेमुळे बँका बंद राहणाट आहेत.
॥ नोव्हेंबर : पाटण्यात छठपूजेमुळे बँका काम करणार नाहीत.
12 नोव्हेंबर : शिलाँगमध्ये वंगला उत्सवानिमित्त सर्व बँका बंद राहणार आहेत.
13 नोव्हेंबर : दुसरा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
14 नोव्हेंबर : देशभरातील बँकांना रविवारची सुट्टी असणार आहे.










