आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. सामाजिक काम करणाऱ्यांच्या अथवा क्रिएटिव्हिटी दाखवणाऱ्यांच्या मदतीला महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा नेहमीच तयार असतात.याची अनेक उदाहरणं तुम्ही पाहिली असतील. त्यांच्या याच कार्यामुळे आनंद महिंद्रा नेहमीच चर्चेत असतात.
आताही आनंद महिंद्रा आपल्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहेत. आनंद महिंद्रा यांना एका 23 वर्षीय स्टार्टअप व्यावसायिकाची आयडिया आवडली. त्याला मदत करण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे. प्लास्टिक बॉटल आणि टाकावू बॅगच्या मदतीनं या मुलाची कंपनी बूटाची निर्मिती करते. या 23 वर्षीय मुलाची आयडिया मंहिंद्रा यांना आवडली. ट्वीट करत महिंद्रा यांनी मन की बात केली आहे. या 23 वर्षीय मुलाचं नाव आशय भावे असं आहे. टाकाऊ प्लॅस्टिकवर रिसायकल करुन बूट तयार करण्याची आयडिया आशय भावे याला शिक्षण घेत असताना सूचली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आशयनं लगेच स्टार्टअप सुरु केलं. आशय भावेच्या स्टार्टअपचं नाव ‘थैली‘ असं आहे. आनंद महिंद्रा आशयच्या या कंपनीची मदत करण्यास तयार आहेत. त्यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.












