Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बसपा च्या वतीने शेतकरी आंदोलनाच्या विजयाचे स्वागत

Nov 20, 2021

मनमाड – गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनाची मोदी सरकारने दखल घेऊन वादग्रस्त तीन कृषी कायदे रद्द केल्याबद्दल येथे ब स पा च्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ फटाके फोडून शेतकऱ्यांच्या विजयाचे स्वागत करण्यात आले.

नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रवीण पगारे यांनी यावेळी आपल्या प्रास्ताविकात बळी गेलेल्या ७०० शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने ५० लाख आणि एका व्यक्तीस सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी केली.
याप्रसंगी ब स पा चे ज्येष्ठ कार्यकर्ते एस.एम. भाले, रवी निकम,बाबा बोरसे, प्रदीप साळवे, मचिंद्रा सोनावणे, गणेश सोनवणे,कैलास गायकवाड, शालिग्राम निकम,शैलेश जगताप, राकेश पगारे,सागर केदारे,केशव पवार,कुणाल अंकुश,किशोर भाटे,बाळू खरे,किरण पगारे,महेंद्र पगारे,सागर त्रिभुवन,राज अहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

नांदगाव : मारुती जगधने दुभाजक संपताच रस्ता अरुंद असल्याने व त्याठिकाणी दिशादर्शक फलक किंवा...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला अभूतपूर्व उत्साहात साजरा

बघा व्हिडिओ – मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला अभूतपूर्व उत्साहात साजरा

मनमाड : योगेश म्हस्के श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र प दस्पर्शाने पावन झालेल्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]