loader image
[ays_poll id=7]

शिर्डी साई प्रसादालय : आजपासून लाडू प्रसाद वाटप सुरू, जिल्हाधिकारी यांची परवानगी!

Nov 25, 2021


7 ऑक्टोबर 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यात आलेले असून करोनाच्या पार्श्वभुमीवर संस्थानचे श्री साईप्रसादालय बंद ठेवण्यात आलेले होते. संस्थानच्यावतीने श्री साईप्रसादालय व लाडू प्रसाद वाटप सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा करण्यात आला होता. या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाली असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानायत यांनी दिली. 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरिता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती बानायत यांनी दिली.

राज्यात आलेल्या करोना संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्यावतीने 05 एप्रिल 2021 पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेले होते. पुन्हा राज्य शासनाने दि 07 ऑक्टोंबर 2021 पासून काही अटी शर्तीवर धार्मिकस्थळे खुले करण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संस्थानचे श्री साईप्रसादालय व भाविकांना लाडू वाटप बंद ठेवण्याबाबात जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन शाखा, अहमदनगर यांनी आदेश पारित केलेले होते.मात्र साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ यांच्याकडून श्री साईप्रसादालय सुरु करण्याबाबत वारंवार मागणी होत होती. त्यानुसार संस्थानच्यावतीने दिनांक 08 नोव्हेंबर 2021 व दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. त्या प्रस्तावास अनुसरुन दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येवुन भाविकांसाठी श्री साईप्रसादालय व लाडु प्रसाद वाटपास काही अटी शर्तीवर परवानगी देण्यात आलेली आहे. शुक्रवार 26 नोव्हेंबर 2021 पासून श्री साईप्रसादालय भाविकांना प्रसाद भोजनाकरीता सुरु करण्यात येणार असून सर्व साईभक्तांनी कोवीड-19 च्या नियमांचे पालन करुन प्रसाद भोजनाचा लाभ घ्यावा. तसेच सर्व साईभक्तांनी व ग्रामस्थांनी संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती बानायत यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

राज्यातील शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण, शासकीय-निमशासकीय कंत्राटी नोकरभरती होणार खासगी कंपन्यांमार्फत

निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारशी...

read more
कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

कोंबड्यांचे जेवण अभियंत्याला पडले महागात – गोंदिया मध्ये लाच लुचपत विभागाने केली अटक

गोंदियामध्ये लाचखोरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनुदानाचे पैसे मंजूर करण्यासाठी दोन हजार...

read more
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणार ? न्यायालयात तारीख पे तारीख

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होईल या संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी अधांतरीच...

read more
स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

स्टेट बँक ऑफ इंडिया ने आणली नवीन मुदत ठेव योजना – जाणून घ्या ” एस बी आय सर्वोत्तम ” योजना

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना एक...

read more
१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

१९ लाख राज्य सरकारी कर्मचारी आज पासून संपावर – जुनी पेन्शन योजना; सरकार कडून ठोस आश्वासन मिळाले नसल्याने संप चिघळणार

जुन्या पेन्शनवर तोडगा न निघाल्याने आता सरकारी कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. विधिमंडळात या...

read more
नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

नांदगाव विधानसभा मतदासंघातील रस्त्यांच्या कामासाठी २१२ कोटी मंजूर – आमदार कांदे यांचा पाठपुरावा

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या पाठपुराव्या मुळे राज्याच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये नांदगाव विधानसभा...

read more
.