आज दि.०६/१२/२०२१ प.पूज्य विश्वरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ऑल इंडिया एस.सी/एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या ओ/ला शाखेत अभिवादन पर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष आयु.प्रदीप जी.गायकवाड, सचिव आयु.चेतन डी.आहिरे, आयु.राहुल केदारे, दीपक बागुल, रवींद्र माळी, दत्तू बत्तीसे, सर्जेराव भालेराव आदी. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादांजली देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन आयु.चेतन डी.आहिरे यांनी केले.
धन्यवाद…!!!
महाराष्ट्राच्या विकासाला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग: डॉ. भारती पवार
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या...










