जातेगाव ता.नांदगाव येथील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याने काढून घेण्यात आलेल्या रोहित्राच्या दोन खांबांमधील रिकाम्या जागेवर चक्क पाळणा बांधून त्यावर प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सूर्यवंशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वीज वितरण कंपनी च्या विरोधात घोषणाबजी करीत आंदोलन सुरू केले. बोलठाण उपविभागातील वीज वितरण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी बांधवांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून अधिकारी वर्ग दखल घेण्याऐवजी कानाडोळा करीत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. अखेर आंदोलनकर्त्याची समजूत घालत बंद रोहित्राच्या जागेवर तातडीने काम सुरू करण्यात आल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
सिनेसृष्टीतील ‘नटसम्राट’ हरपला
भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी...










