Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वातावरणातील अचानक बदलामुळे भाजीपाल्याची आवाक घटली

Dec 30, 2021

काही दिवसांपासून वातावरणात अचानकपणे बदल झाल्यामुळे भाजीपाल्याची आवाक घटली आहे. मात्र त्याचा परिणाम भाज्यांच्या भाववाढीवर झालेला दिसतो. वांगी, गवार १२० किलो या भावात विकण्यात येत आहेत. शेवगा, मटार, भेंडी यांच्या किमतीही वाढल्या आहेत
मनमाड शहरातील भाजी बाजारात वांग्याचे भावाने शंभरी पार केली आहे. गवार आणि दोडके
भावात तेजी दिसून येत आहे. शहराजवळील नांदगाव, येवला आणि चांदवड, मालेगाव तालुक्यातील गावांमधून भाजीपाला बाजारात विक्रीसाठी दररोज येत असतो.
भाजीपाला मार्केट मध्ये दररोज भाजी बाजारात गवार, भेंडी, वांगी, कारले, दोडके भाज्यांना मागणी वाढल्याने आणि इतर ठिकाणी माल गेल्याने भावात वाढ झाली असल्याचे भाजीविक्रेता व्यापारी सांगतात. शहरातील
खंडेराव महाराज मंदिर परिसर, आठवडे बाजार भाग, स्टेडियम परिसर, कीर्ती नगर भाग आदी परिसरातील भागातील भाजी बाजारात अनेक भाज्यांच्या दरात मोठी भाववाढ झाली आहे. दोन दिवसापासून मोंढ्यात वांगे, गवार, कारले मागणी वाढली आहे. भाजी भाव चांगलेच वाढले आहेत. भाजी २५ ते ३० रुपये पावकिलो प्रमाणे घेण्यास ग्राहक मोलभाव करतात. आम्ही कसा भाजीपाला विकावा. शहरात इतर शहरातूनही येत असल्याने बाजारातील भाववाढीचा परिणाम येथील बाजारावर दिसतो. दहा दिवसांपूर्वी गवार, फ्लावर, वांगी, भेंडी, घेवडा, कारले, टोमॅटो, शेवगा या भाज्यांची किंमत ७० ते ८० रुपये किलो होती. आता वांगी १२०, गवार १२०, शेवगा १३०, मटर ५०, गाजर ४०, टोमॅटो ४०, भेंडी १००, कारले १००, फ्लॉवर ८०, वाल शेंग ६०, कोबी ६०, मिरची ६० प्रतिकिलो भाव आहेत वातावरणामुळे भाज्यांची आवक घटत असल्याने बाहेरून येणाऱ्या भाज्यांची किंमत या अचानकपणे वाढलेल्या आहेत. मुख्य बाजारपेठेत भाज्यांचे भाव कमी झाले तर ग्राहकांना भाजी स्वस्त देता येईल असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]