Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात स्वर्गीय रेणुका हिरे यांना अभिवादन

Dec 31, 2021

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय रेणुका (आजी)भाऊसाहेब हिरे यांच्या 114 व्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की ,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्याप्रमाणे कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक कार्यात आजींचे फार मोठे योगदान राहिलेले आहे.त्यांनी आपले जीवन व कुटुंब सामाजिक व शैक्षणिक कार्यात वाहून घेतले होते. कौटुंबिक संस्काराचा वारसा आजींनी पुढे चालविला व समाजासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता असे विचार व्यक्त केले. याप्रसंगी भूगोल शास्त्र विभागाचे प्रा.डॉ. गणेश गांगुर्डे यांनी रेणुका आजींचा जीवन कार्याचा परिचय करून देताना भाऊसाहेबांच्या राजकीय व सामाजिक कार्यात आजींनी कशा पद्धतीने मोलाची साथ दिली. याबद्दलची माहिती देऊन उदाहरण दाखले दिले भाऊसाहेब हिरे महसूल मंत्री असताना कुळ कायदा निर्मिती झाली तत्काळात आजी भाऊसाहेब हिरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.एक करारी व्यक्तिमत्व हा त्यांचा एक विशेष गुण दिसून आला.यासंबंधी माहिती दिली.
कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या सौ. ज्योती पालवे ,वरिष्ठ पर्यवेक्षक डॉ.सतीश तांबे, कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा., विठ्ठल फंड, कुलसचिव समाधान केदारे, प्राध्यापक वृंद, कार्यालयीन कर्मचारी,व विद्यार्थी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य...

read more
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेली PAT-2 चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात

विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

मनमाड येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधी व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]