Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

निवडणूक खर्च : निवडणूक आयोगाने केली मोठी घोषणा !

Jan 7, 2022

आगामी काळात होऊ घातलेल्या ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतिक्षा असतानाच निवडणूक आयोगाने निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार, आता लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना ९० लाखांपर्यंत खर्च करता येणार आहे. याआधी ही मर्यादा ७० लाख रुपये इतकी होती. तर दुसरीकडे छोट्या राज्यांमधील उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा ५४ लाखांवरून ७५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन देखील काढलं असून त्यामध्ये कोणत्या राज्यासाठी खर्चाची किती मर्यादा आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

लोकसभेसोबतच विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांना करता येणाऱ्या खर्चाची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. आगामी ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा मोठा प्रभाव दिसून येऊ शकतो. विधानसभा निवडणुकांसाठी मोठ्या राज्यांमधील उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाखांवरून ४० लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लहान राज्यांसाठी ही मर्यादा २० लाखांवरून २८ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

आ.सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रौनक सोशल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

आ.सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रौनक सोशल फाउंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर

आमदार सुहास कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील रौनक सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरात आरोग्य तपासणी...

read more
फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ

फुले-आंबेडकरी शैक्षणिक विचार आचरणात यावे,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असल्याशिवाय देशोन्नती अशक्य : शरद शेजवळ

येवला (प्रतिनिधी) : महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार कार्य अंगीकारले शिवाय...

read more
नांदगाव – मनमाड सह राज्यातील २८१ बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर .

नांदगाव – मनमाड सह राज्यातील २८१ बाजार समितीच्या सार्वत्रीक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर .

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : राज्यातील २८१ बाजार समिती निवडणुक कार्यक्रम डॉ. पी. एल. खंडागळे सचीव...

read more
श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (बोलठाण) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज (बोलठाण) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदगाव : नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज, येथे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]