Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिष्यवृत्ती परीक्षेत छत्रे न्यू इंग्लीश स्कुल चे घवघवीत यश

Jan 8, 2022

ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित छत्रे न्यू इंग्लीश स्कूल मनमाड च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत. यामध्ये इयत्ता ५ वी मधील अथर्व मल्लिकार्जुन डांगरे (जिल्हा यादी क्र. ८१) आणि तनुज दत्तू जाधव (जिल्हा यादी क्र. ३३०) तसेच इयत्ता ८ वी मधील शौर्य श्रीओमकुमार गोखले ( जिल्हा यादी क्र. २०३ ) या विद्यार्थ्यांना शासकीय शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.या सर्व विद्यार्थ्यांना पंकज पाखले व अशोक भोये या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. आबासाहेब दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर , संचालक प्रसाद पंचवाघ , मुख्याध्यापिका सौ. के.एस.लांबोळे , उपमुख्याध्यापक आर.एन. थोरात, पर्यवेक्षक संदीप देशपांडे , प्रवीण व्यवहारे आदींनी अभिनंदन केले.

अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]