loader image
[ays_poll id=7]

डॉ. नरेश गिते महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) पदी रुजू

Jan 13, 2022


महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून डॉ. नरेश गिते यांनी गुरुवारी (दि. १३) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये ३८ वर्षांचा प्रशासकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. नरेश गिते यांनी १९८३ मध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर सन २००९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवामध्ये (आयएएस) डॉ. गिते यांची निवड झाली. त्यानंतर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त, राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव, महानंद डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक आदी पदांवर डॉ. गिते यांनी काम केले आहे.

तसेच महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. नरेश गिते यांनी सुमारे नऊ महिन्यांच्या कालावधीत प्रामुख्याने ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा तसेच थेट गावात जाऊन वीजप्रश्न सोडविण्यावर भर दिला. राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०च्या अंमलबजावणीची विशेष जबाबदारी महावितरणच्या व्यवस्थापनाकडून डॉ. गिते यांच्याकडे देण्यात आली होती. यामध्ये ४५ दिवसांच्या ‘कृषी ऊर्जा पर्वा’च्या माध्यमातून ही योजना गावोगावी पोहोचविण्यात त्यांनी योगदान दिले. गेल्या वर्षी मे महिन्यात ते सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर महावितरणच्या संचालक (मानव संसाधन) पदी थेट भरती प्रक्रियेतून डॉ. गिते यांची नुकतीच निवड झाली.

राज्यातील 2 कोटी ८० लाख वीजग्राहकांना सेवा देणाऱ्या महावितरणचे अंतर्गत मानव संसाधनाचे प्रशासकीय कामकाज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणखी वेगवान तसेच तत्पर व सकारात्मक करण्यास प्राधान्य देण्यात येईल असे डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.