मनमाड शहराच्या करंजवण जलवाहिनी योजनेसाठी साडेतीनशे कोटी रुपये मंजूर करून नगरविकास विभागातर्फे मंजुरी दिली असून लवकरच या कामाचा प्रारंभ केला जाईल या बरोबरच शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणाच्या दुरुस्ती साठी निधी आणि शहरातील पूल,अंतर्गत रस्त्यांसाठी निधी दिला जाईल अशी माहिती राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ना. शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी असलेले नितीन लालसरे यांच्या विवाहसोहळ्यानिमित्त त्यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आले अस ते बोलत होते आमदार सुहास कांदे, गटनेते गणेश धात्रक, नांदगावचे नगराध्यक्ष बबी कवडे, अलताफखान,शहर प्रमुख मयूर बोरसे, सुनील पाटील,साईनाथ गिडगे महेंद्र शिरसाठ,प्रमोद पाचोरकर, सुधाकर मोरे आदी उपस्थित होते.











