loader image
[ays_poll id=7]

उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहक नाराज

Jan 19, 2022

नव्या वर्षाच्या सुरुवातीला उज्वला घरगुती गॅस सिलेंडरवरची सबसिडी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अद्यापही सबसिडी मिळत नसल्याने गॅस ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे अगोदरच कोरोना, लॉकडाऊन, निर्बंधांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून सुमारे दीड वर्षांपासून सबसिडी बंद असल्याने सध्या सिलिंडरसाठी पूर्ण पैसे  मोजावे लागत आहेत. कोविड आणि लॉकडाउनमुळे मागील सुमारे दीड वर्षांपासून घरगुती उज्वला गॅस सिलिंडरवर मिळणारी सबसिडी बंद करण्यात आली आहे. तर २०२२ च्या नवीन वर्षापासून सबसिडी पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही सबसिडी जमा करण्यात येत नसल्याने नागरिकांची निराशा झाली आहे. त्यामुळे नव्या वर्षातही वाढीव दराने गॅस सिलिंडर घेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. शहरातील गॅस वितरकांनाही सबसिडी कधी जमा होईल याची माहिती नाही त्यामुळे नागरिकांना घरगुती उज्वला  सिलिंडरवरील सबसिडी मिळविण्यासाठी अजून वाट पाहावी लागणार की काय असे वाटते आहे. आर्थिक वर्षाची सुरुवात एप्रिल ते मार्च असल्याने गॅस वितरकांकडून या आर्थिक वर्षानुसार सिलिंडर वितरण करण्यात येते. यामुळे वर्षभरात एका कुटुंबियांना १२ सिलिंडर देण्याचा नियम आहे. एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्षानुसार याचा हिशोब ठेवण्यात येतो. यामुळे सबसिडीची रक्कम येत्या एप्रिल २०२२ नंतर संबंधितांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांना आणखी किमान तीन महिने तरी सबसिडी गॅस सिलिंडरसाठी वाट पहावी  लागणार आहेत. नवीन वर्षापासून घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी जमा करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून यामुळे अनेक ग्राहकांनी संबंधित गॅस वितरकांच्या कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी सुरु केली आहे. मात्र, वितरकांनाही याबाबत काही माहिती नसल्याने गॅस ग्राहकांना निराश होऊन परतावे लागत आहे.

अजून बातम्या वाचा..

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

माघ मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 16/02/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी गणेश जयंती उत्सव 2025 निमित्ताने रु.23000/- किंमतीचे ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
.