loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या इतिहासातील काही रंजक तथ्य!

Jan 31, 2022

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सलग चौथ्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाशी निगडीत काही रंजक तथ्यही आहेत.

▪️भारताचा पहिला अर्थसंकल्प: भारतात 7 एप्रिल 1860 रोजी पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ईस्ट इंडिया कंपनीचे स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी अर्थसंकल्प सादर केला.

▪️स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला. तत्कालीन अर्थ मंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी अर्थ संकल्प सादर केला.

▪️ सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण : निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2020-21 चा अर्थसंकल्प सादर करताना दोन तास 42 मिनिटांचे भाषण दिले. या दरम्यान त्यांनी 2 जुलै 2019 रोजी अर्थसंकल्प सादर करताना स्वत: केलेल्या दोन तास 17 मिनिटे भाषणाचा विक्रम मोडला.

▪️ डॉ. मनमोहन सिंह यांनी 1991 रोजी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सर्वाधिक शब्द होते. या भाषणात 18 हजार 650 शब्द होते. त्यानंतर अरुण जेटली यांनी 2018 मध्ये अर्थसंकल्पीय भाषण करताना 18 हजार 604 शब्दांचा वापर केला होता.

▪️वर्ष 1977 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री हिरूभाई मुलजीबाई पटेल यांनी 1977 मध्ये केलेले अर्थसंकल्पीय भाषण सर्वात लहान भाषण आहे. जवळपास 800 शब्दांचे हे भाषण होते.

▪️ माजी पंतप्रधान मोररजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. मोररजी देसाई यांनी 1962-69 दरम्यान अर्थ मंत्री असताना सर्वाधिक 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानंतर पी. चिदंबरम (9 वेळा), प्रणब मुखर्जी (8 वेळा), यशवंत सिन्हा (8 वेळा) आणि डॉ. मनमोहन सिंह (6 वेळा) यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे.

▪️वर्ष 1999 पर्यंत अर्थसंकल्पीय भाषण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता सादर केले जात असे. मात्र, यशवंत सिन्हा यांनी 1999 रोजी ही वेळ बदलली. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यास त्यांनी सुरुवात केली.

▪️ वर्ष 2017 मध्ये अरुण जेटली यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्प एक फेब्रुवारीपासून सादर केला जाऊ लागला.

▪️ वर्ष 2017 पर्यंत रेल्वे अर्थसंकल्प आणि केंद्रीय अर्थसंकल्प वेगवेगळे सादर केले जात असे. मात्र, 2017 मध्ये रेल्वे अर्थ संकल्प हे केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

राज्यातील सर्व धर्मीयांमधील ६० वर्ष झालेल्या आणी त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मुख्यमंञी तिर्थ दर्शन याञा हि लाभाची योजना लागू केली आहे.

  नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्यशासनाने ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड -मनमाड शहाराचे सांस्कृतिक सामाजिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद वाक्य...

read more
.