मनमाड नगरपरिषदेत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांची व त्यांच्या कुटुंबीयांची लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी च्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. सुमारे १४९ रुग्णांनी ह्या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी २५००० रुपयांची औषधे गरजूंना देण्यात आली.या शिबिरात रक्तदाब,मधुमेह, संधिवात यांसह विविध तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी डॉ.प्रताप गुजराथी, डॉ.निलेश राठी, डॉ.नूतन पहाडे,पुष्पाताई मतकर,वैशाली वाणी,गणेश हाडपे, विजय जैन यांसह क्लब चे सदस्य उपस्थित होते.संदीप भोर,विशाल बहोत,मयूर यांनी विशेष परिश्रम घेतले.
तक्रारदार शेतकऱ्यांना थकीत रक्कम अदा
मनमाड - येथील मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव यांनी शेतकरी बांधवांचे...









