Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडीओ) मनमाड लगतच्या कातरवाडी परिसरात जोरदार पाऊस

मनमाड (अजय सोनवणे): मनमाड सह त्याच्या आजूबाजूच्या परिसरात सतत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे,काल...

read more
आ.सुहास कांदे रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

आ.सुहास कांदे रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

नांदगाव शहरातील आ. सुहास कांदे रहेनुमा फाउडेंशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार संभारभ...

read more

(बघा व्हिडिओ)मनमाडच्या शिवसैनिकांची पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

राज्यात ठिकठिकाणी सद्य राजकीय परिस्थितीवर समर्थन आणि विरोध प्रदर्शन सुरू आहे. आज मनमाडमध्ये सुद्धा...

read more
वंजारी समाज फाउंडेशनच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वंजारी समाज फाउंडेशनच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वंजारी समाज फाउंडेशनच्यावतीने मनमाड येथील हुडको वसाहत येथील पंचशील वाचनालयामध्ये राजर्षी शाहू...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]