Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड – लासलगाव मार्गावर एका व्यक्तीचा धारदार हत्याराने खून

Feb 7, 2022

जनावरे खरेदी विक्री करणाऱ्या पिंपळगाव धाबळी येथील अनिल आहिरें (वय-32) नामक तरुणाचा येथील मनमाड लासलगाव रोड परिसरात धारदार शस्त्राचा वापर करून खून करण्यात आल्याची घटना घडली असून अनिलच्या डोक्यावर,पायावर आणि पोटावर धारदार हत्याराने वार करून त्याला ठार मारण्यात आले. रविवारी घरून निघतांना पिकावरील औषधे आणण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र रात्री परत आला नाही असे त्याच्या भावाने सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक समीरसिंह साळवे,पोलिस निरीक्षक समीर बावरकर,सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते,गजानन राठोड,हरिश्चंद्र पाळवी,अशोक पवार,नरेश सौंदाने, उत्तम गोसावी,मुदस्सर शेख,गणेश नरवटे,संदीप झालटे, रणजित चव्हाण आदीनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.चांदवड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे पोलीस उपअधीक्षक समिरसिंग साळवे यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन चे पानेवाडी इंधन प्रकल्पासमोर धरणे आंदोलन

नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेलफेअर असोसिएशन चे पानेवाडी इंधन प्रकल्पासमोर धरणे आंदोलन

मनमाड(अजय सोनवणे) उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना इंधन पुरवठा करणाऱ्या मनमाड जवळच्या...

read more

भुमी क्रिकेट अकॅडमी चे रुषी शर्मा,वेदांत कांदळकर,अंशुमन सरोदे यांची हिंगोली जिल्हा संघात निवड

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 16 वर्षा आतील आमंत्रितांच्या स्पर्धेत मनमाड...

read more
नांदगाव येथील कवी काशिनाथ गवळी यांची नाशिक जिल्हा साहित्यकणा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदी निवड

नांदगाव येथील कवी काशिनाथ गवळी यांची नाशिक जिल्हा साहित्यकणा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षपदी निवड

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील समर्थ मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये साहित्यकणा फाउंडेशनच्या ८ व्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]