Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर भाजपा व्यापारी आघाडी तर्फे मालमत्ता कर व पाणी पट्टी कर आकारणी वरील व्याज माफ करण्याची मागणी

Feb 18, 2022

मार्च 2020 ते मार्च 2022 या चोवीस महिन्याच्या कालावधीत संपूर्ण देशात कोरोना संकट आले त्याला मनमाड शहर देखील अपवाद नाही मनमाड हे कामगार वस्ती चे शहर आहे गेल्या 02 वर्षा च्या काळा मध्ये मात्र 06 महिने वगळता 18 महिने कधी पूर्ण तर कधी अंशतः लॉक डाउन मूळे मनमाड शहराचे अर्थकारण ठप्प झाले होते त्यामुळे अनेक व्यापारी व्यवसायिक, कामगार ,,हात मजूर कारागीर खाजगी नोकरदार,सेवानिवृत्त कर्मचारी, हे मोठया आर्थिक संकटात आले आहेत तश्यातच मनमाड नगरपालिकेच्या वतीने शहरात मालमत्ता कर व पाणी पट्टी कर वसुली सुरु आहे आणि मनमाड नगरपालिका च्या वतीने व्यापारी मालमत्ता करा मध्ये 10 ते 15 टक्के वाढ करण्यात आली आहे आणि या थकीत करा साठी दर साल 24% व्याज आकारणी मालमत्ता धारकांना केली जात आहे दोन वर्षात शहरातील अर्थकारण ची दुरावस्था झाली असल्याने कोरोना काळातील या मालमत्ता कर व पाणी पट्टी करा च्या आकारणी वरील व्याज सरसकट सर्व मालमत्ता धारकांना माफ करण्यात यावे यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी करणारे निवेदन मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मा सचिन पटेल यांना मनमाड शहर भाजपा चे वतीने देण्यात आले यावेळी भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, भाजपा नासिक जिल्हा व्यापारी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी, भाजपा व्यापारी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत ,भाजपा व्यापारी आघाडी चे मनमाड शहर अध्यक्ष अमित गोगड ,भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी सरचिटणीस एकनाथ बोडखे आदी प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी मनमाड भाजपा पदाधिकाऱ्यां समवेत चर्चा दरम्यान मनमाड पालिकेचे मुख्याधिकारी सचिन पटेल यांनी या मागणी निवेदन संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]