मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फा.सॅबी कोरीया, सिस्टर ज्योत्स्ना व अध्यक्षस्थानी कुमारी हर्षदा कांबळे
(विद्यार्थीनी) आदी मान्यवर उपस्थित होते. श्रीमती जयश्री पारखे मॅडम यांनी सूत्रसंचालन केले. तसेच आभारही मानले. कुमारी हर्षदा राघो कांबळे हिने आपल्या ओघवत्या व ओजस्वी भाषेतून शिवचरित्र डोळ्यासमोर उभे केले.मा.मुख्याधापक फा. सॅबी कोरीया यांनी आपल्या भाषणातून छ.शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची ओळख करून दिली.व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मनमाड शहरात श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा साजरा
मनमाड : योगेश म्हस्के ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', हे वचन ऐकल्यावर डोळ्यासमोर जी मुर्ती उभी...











