Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Mar 1, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए व्हि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. भारताचे प्रथम नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक डॉ सी व्ही रमण यांनी २८ फेब्रुवारी १९३० ला रॅमन इफेक्ट हा शोधनिबंध सादर केला व त्या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी १९८७ पासुन विज्ञान,माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त डॉ पवनसिंग परदेशी यांचे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आपल्या आसपास घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींकडे डोळसपणे पाहून त्यातील वैज्ञानिकदृष्टीकोन समजून घ्यावा असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात डॉ एस पी खैरनार यांनी विज्ञानाला अध्यात्माची बैठक असेल तरच ते मानव जीवनाला उपयुक्त असेल अन्यथा ते मानवी संहाराला कारणीभूत ठरेल हे उदाहरणसह पटवून दिले .याप्रसंगी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सलोनी निकाळे व जयेश सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ राहुल शिंदे व आभार प्रदर्शन प्रा.ए आर बुकाने यांनी केले. या कार्यक्रमास विज्ञान विभागाचे पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे, प्रा. डब्ल्यू.के. गागरे तसेच विज्ञान विभागाचे शिक्षक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

केमीकल वाहतूक करणारा १६ चाकी मालट्रक दुभाजकावर आदळला एकाच वेळी आठ टायर फुटल्याने झाला मोठा आवाज – नांदगाव येथील घटना

नांदगाव : मारुती जगधने दुभाजक संपताच रस्ता अरुंद असल्याने व त्याठिकाणी दिशादर्शक फलक किंवा...

read more
बघा व्हिडिओ – मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला अभूतपूर्व उत्साहात साजरा

बघा व्हिडिओ – मनमाड गुप्तसर साहेब गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेला अभूतपूर्व उत्साहात साजरा

मनमाड : योगेश म्हस्के श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र प दस्पर्शाने पावन झालेल्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]