Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयाची विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी

Mar 4, 2022

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या मार्फत पॉवरलिफ्टिंग या क्रीडा स्पर्धांचे आयोजन चांदवड महाविद्यालय मार्फत करण्यात आले होते.सदर पॉवरलिफ्टिंग आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. उपरोक्त स्पर्धेसाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या ०८ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता .यात महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर सर्व ०८ खेळाडूंची निवड कोपरगाव येथे दिनांक ३/०३/२२ रोजी पार पडलेल्या आंतरविभागीय पॉवरलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेस झाली होती . सदर स्पर्धेत कु दिया व्यवहारे (प्रथम ४७ kg) कु खुशाली गांगुर्डे (प्रथम ५२ kg) कु नूतन दराडे (द्वितीय ५७ kg ) कु साक्षी पांडे (प्रथम ६३ kg ) कु करून गाडे (प्रथम ७६ kg ) कु धनश्री बेदाडे (तृतीय ८४ kg ), यांनी आप आपल्या वजन गटात सुवर्ण कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला व नाशिक विभागाच्या संघास मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद मिळून दिले.सदर स्पर्धा ह्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव येथे घेण्यात आल्या होत्या.
महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे, राष्ट्रीय प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड व महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

अजून बातम्या वाचा..

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची बैठक येवला रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली.

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ची बैठक येवला रेल्वे स्टेशन येथे संपन्न झाली.

यावेळी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून...

read more
भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी  नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

भारतीय अन्न महामंडळाच्या राज्य सदस्य पदी नांदगाव चे सिद्वेश्वर ( बापु ) शिंदे यांची निवड

नांदगाव सोमनाथ घोंगाणे धनगर समाज संघर्ष समिती चे प्रदेशाध्यक्ष सिध्देश्वर (बापु) शिंदे यांची भारत...

read more
मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या ७० वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

मनमाड महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या ७० वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]