शनिवार दिनांक १९/३/२०२२ रोजी भुसावळ विभागाचे प्रबंधक एस.एस.केडिया हे मनमाड येथे पाहणी दौऱ्यावर आले असता मनमाड नाशिक प्रवाशी संघटनेच्या वतीने कोरोना काळापासून बंद करण्यात आलेली गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी तातडीने सुरू करावी, चाकरमान्यांना आणि विशेषतः विद्यार्थ्यांना ही गाडी बंद झाल्यापासून अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे अशा आशयाचे निवेदन नरेंद्र खैरे,आकिब पठाण,राजेंद्र भडके,संदीप व्यवहारे,राहुल सांगळे सुनील पवार आदींनी रेल्वे प्रबंधकांची भेट घेवून दिले.













