बेइंग वुमन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका यांना स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा ग्रंथांची भेट नाशिक येथील भुजबळ फार्म येथे नांदगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते मुक्तीभूमी वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ,सदस्य जीवन पानपाटील यांना येथे देण्यात आली.
अखिल भारतीय समता परिषदेचे दिलीप आण्णा खैरे, भालचंद्र भुजबळ,मविप्रचे संचालक अंबादास बनकर,बेइंग वुमन्स चॅरिटेबल ट्रस्ट नाशिकच्या संस्थापक सुजाता बर्वे,सामाजिक कार्यकर्ते रुपेश कटारे,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका येवला (नाशिक) चे संस्थापक प्रा शरद शेजवळ सदस्य जीवन पानपाटील,छात्रभारतीचे राज्य सचिव समाधान बागुल,शहर प्रमुख देविदास हजारे,स्वप्नील कुंभारकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
मनमाड शहरातील नगरचौकी येथील अंतर्गत पाईपलाईन कामाचे सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
मनमाड - आजपर्यंत फक्त पाण्यासाठीचे आश्वासने मिळालीत.एकदा एक योजना मंजूर झाली.मात्र काम न करताच...











