Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक हवामान दिन साजरा

Mar 24, 2022


महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए.व्ही. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भूगोल विभागांतर्गत 23 मार्च जागतिक हवामान दिन निमित्त हवामान बदल- वैश्विक ते स्थानिक या विषयावरती एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले या ऑनलाइन वेबिनारसाठी साठी प्रमुख व्याख्याते म्हणून एस पी महाविद्यालय पुणे येथील प्राध्यापिका ललित माधवराव ठाकरे यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले तसेच आपण प्रत्येकाने नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण केले पाहिजे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तात्काळ त्यावर कार्यवाही करणे अत्यंत महत्त्वाचे असते तसेच या वर्षाचा जागतिक हवामान संघटनेचे घोषवाक्य ” त्वरित सूचना आणि तात्काळ उपाय” याचा अर्थ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि मिळालेल्या इशाऱ्यावर त्वरित उपाय करणे हे मॅडम ने पटवून दिले थोडक्यात हवामान बदलांमध्ये प्रत्येक नागरिकाचे स्थान आणि त्याचा जीवनशैलीचा पृथ्वीच्या वातावरणावर कसा परिणाम होतो हे समजावून सांगितले आणि लोकांना त्यानुसार बदलण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून जागतिक हवामानावर झालेल्या परिणामामुळे पृथ्वीवरील सजीवांना ते परिणाम भोगावे लागणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे काळाची गरज आहे मानवी जीवन अनमोल आहे त्याच बरोबर पृथ्वीवरील इतर सजीव देखील अनमोल आहेत त्यावर सगळी अन्नसाखळी अवलंबून आहे म्हणून बदलत्या हवामानाचा जो परिणाम होतो तो परिणाम तात्काळ लक्षात घेऊन त्यावर त्वरित कारवाई करणे म्हणजेच पृथ्वीवरील सर्व अन्नसाखळी अबाधित राहतील पृथ्वीवरील सरासरी तापमान वाढ होत आहे त्याचा परिणाम पृथ्वीवरील सजीव सृष्टी साठी अस्तित्वासाठी अत्यंत घातक आहे म्हणून जागतिक तापमानात वाढ होणार नाही यासाठी मानवाने सजग राहणे ही काळाची गरज आहे या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून निमगाव महाविद्यालय येथील प्राचार्य सुभाष निकम सर व म. स. गा. महाविद्यालय येथील उप-प्राचार्य डॉ. सी.एम. निकम सर मनमाड महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर सर उपस्थित होते कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे व कार्यालयीन अधीक्षक श्री एकनाथ अहिरे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभाग प्रमुख प्रा सुरेश आर. पगार सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रा. देविदास विठ्ठल सोनवणे व कार्यक्रमाचे आभार कॅप्टन प्रकाश आर. बर्डे यानी केले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न

मतदारसंघातप्रत्येक घरा घरात २४ तास पाणी यावे हेच माझं स्वप्न – आमदार कांदे जलजीवन मिशन कामांचे लोकार्पण व पाहणी दौरा संपन्न

नांदगाव तालुक्यातील कासारी व बोलठाण घाटमाथा परिसरात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा...

read more
मनमाड नगरपालिका प्रशासनाचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष ; नागरिकांचे हाल – शिवसेना (ऊबाठा) गटाचे धरणे आंदोलन

मनमाड नगरपालिका प्रशासनाचे शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष ; नागरिकांचे हाल – शिवसेना (ऊबाठा) गटाचे धरणे आंदोलन

मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असूनही नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे व...

read more
केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळाची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]