loader image

शिवसेनेच्या नवनिर्वाचित संचालकांचे आमदार कांदे यांनी केले अभिनंदन

Apr 11, 2022


नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित निवडणुकांचा जवळपास शंभर टक्के निकाल हा शिवसेनेच्या बाजूने लागल्याचा आनंद आज नांदगाव येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृह वर साजरा करण्यात आला.आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वात नांदगाव विधानसभा मतदारसंघातील सोसायटी निवडणुकांमध्ये एक किंवा दोन सोसायट्या सोडल्या तर सर्वच सोसायट्यांवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे आणि आमदार सुहास आण्णा कांदे यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले आहे.सोसायटी निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी आज आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शिवनेरी शासकीय विश्रामगृहावर ालुक्‍यातील सर्वच नवनिर्वाचित संचालक यांना आमंत्रित करून त्यांचे शाल श्रीफळ देऊन अभिनंदन केले.याप्रसंगी मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेनेच्या विजय झालेल्या सर्वच्या सर्व सोसायटी संचालक याप्रसंगी आनंदात आणि उत्साहात दिसून आला.या कार्यक्रमाप्रसंगी माजी सभापती विलास आहेर यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास आण्णा कांदे यांचे अभिनंदन करत येत्या काळात शिवसेना पक्षा चा झेंडा प्रत्येक निवडणुकीत फडकवण्याचा निर्धार केला.जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करून तालुक्यात शिवसेना पक्षाने मिळवलेला विजय हा अण्णासाहेबांचा विजय असून अण्णासाहेबांच्या दमदार नेतृत्वामुळेच हा विजय मिळाला असल्याचे श्रेय त्यांना जाते असे मत व्यक्त केले.आमदार सुहास आण्णा कांदे यांनी याप्रसंगी बोलताना आपण सर्वांनी मिळून एकजुटीने शिवसेनेचा भगवा संपूर्ण तालुका भर सोसायटीवर फडकविला या बद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन एक आमदार म्हणून आपण आपल्या वैयक्तिक सामाजिक कोणतीही अडचणी असतील तर त्या मला सांगा मी त्या सोडविण्यासाठी तत्पर राहील आपल्या माता मुळेच मी आज आमदार आहे आणि आपले प्रत्येक अडचण सोडवणे हे माझे कर्तव्य आहे सोसायटीच्या माध्यमातून विजयी झालेल्या सर्व संचालकांचे आभार मानत भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.